Ticker

6/recent/ticker-posts

वेकोली क्षेत्रीय कार्यालय, उमरेड येथे आज उमरेड तालुक्यातील मौजा- हेवती या गावचे पुनर्वसन .

 


भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी - 

उमरेड - 

वेकोली क्षेत्रीय कार्यालय, उमरेड येथे आज उमरेड तालुक्यातील मौजा- हेवती या गावचे पुनर्वसन आणि येथे सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत  माजी आमदार सुधीर पारवे यांचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदन देण्यात आले - 

खालील विषयाच्या अनुषंगाने वेकोलीचे क्षेत्रिय कार्यालय उमरेड येथे क्षेत्रिय महाप्रबंधक मा.श्री अविनाश प्रसाद आणि हेवती गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुनर्वसन ठिकाणाची अधिकाऱ्यांसह माजी आमदार सुधीर पारवे यांनी पाहणी केली.

बैठकीतील विषय खालीलप्रमाणे मांडण्यात आले आहे :-

• गावचे पुनर्वसन आणि घरासाठी भरपाई देण्याची तारीख निश्चित करणे.

• नियोजित पुनर्वसन स्थळी नागरी सुविधा पुरवणे.

• मेन रोड ते पुनर्वसन गावापर्यंत पोहच रस्ता बांधणे. (पुनर्स्थापित गावापासून राष्ट्रीय महामार्ग ३५३D पर्यंत)

• पुनर्वसन वस्तीतील लोकसंख्येच्या आधारावर शाश्वत पद्धतीने पाण्याची व्यवस्था करणे.

• पुनर्वसन क्षेत्रात जीर्ण झालेल्या जुन्या नागरी सुविधा पाडून नवीन नागरी सुविधा बांधणे.

यावेळी वरील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असुन लवकरच प्रश्न निकाली काढू असा क्षेत्रिय महाप्रबंधक श्री अविनाश प्रसाद यांनी विश्वास व्यक्त केला असे माजी आमदार सुधीर पारवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यावेळी ग्रामपंचायत हेवतीचे सरपंच श्री. राकेशजी ठाकरे, श्री. सुभाषजी गुप्ता, डॉ. शंभरकर यांच्या सह वेकोलीचे प्रमुख अधिकारी कर्मचारी आणि गावकरी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.

गावं. उमरेड

तारीख.०८.०१.२०२६