Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित कार्यक्रमाचे आयोजन.प्रा डॉ विजय गायकवाड




रिसोड

ता. 21/01/2026

रिसोड : येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉ. एम .एन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी विभागाचे प्रा डॉ सिद्धार्थ इंगोले यांच्या नियोजनाखाली मराठी भाषा पंधरवडा जनजागृती कार्यक्रमानिमित्त "मराठी भाषेचे भावी भवितव्य"  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषा जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ. आर .व्हि. मोरे यांनी मराठी भाषेविषयी जनजागृती संबोधित करताना असे म्हटले की. "मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजीत भाषा होती. मात्र आता तिला राजमान्यताही मिळाली असून या भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे .मराठी भाषा संवर्धनासाठी आपण ती बोलती ठेवली पाहिजे. त्याशिवाय ती टिकणार नाही" असे प्रतिपादन केले. तर मराठी विभागाचे प्रा डॉ इंगोले म्हणाले की "मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रम चा मुख्य उद्देश हा मराठी भाषेचा अभिमान जागृत करणे आणि तिचा प्रसार करणे हा असतो"

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ अतुल खोटे, सुत्रसंचलन प्रा डॉ. प्रकाश हनवते व आभार  कु. श्रद्धा सुरसे या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.