गायकवाड जळगाव प्रतिनिधी शौकत शेख
आज गायकवाड जळगाव तालुका गेवराई येथे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम पार पडला गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या नवीन ग्रामपंचायत इमारत तसेच नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयुष्यमान आरोग्य केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आला या नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायतचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होणार असून आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावातील नागरिकांना प्राथमिक व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा गावातच उपलब्ध होणार आहे विशेष करून गावातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबाला याचा मोठा लाभ होणार आहे उद्घाटन कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे
माननीय. आमदार .अमरसिंह शिवाजीराव पंडित चेअरमन. जय भवानी सहकारी साखर कारखाना तथा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थिती. माननीय आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित सदस्य विधानसभा गेवराई .श्री. अनिरुद्ध सानप. गट विकास अधिकारी गेवराई श्री एस. एस .चोपडे उपअभियंता गेवराई श्री बी .बी .मगर कनिष्ठ अभियंता गेवराई गायकवाड जळगाव ग्रामपंचायत सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. ग्रामसेवक. ग्रामपंचायत कामगार. आरोग्य सेवक. अंगणवाडी सेविका. ग्रामपंचायत ऑनलाईन ऑपरेटर. तंटामुक्ती अध्यक्ष. या सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत गावाच्या प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे विकास कामे म्हणजे गायकवाड जळगावच्या उज्वल भविष्यासाठी टाकलेले ठोस पाऊल असून यामुळे गावचा सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील विकास निश्चितच वेग घेईल असे मत सर्वांनी व्यक्त केले आहे.





Social Plugin