Ticker

6/recent/ticker-posts

शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष मुजूभाई सय्यद यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.



बिलोली प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश

नांदेड : संपूर्ण देशात आजचा दिवस हा नवीन वर्षात पदार्पण करण्यात येतो. 2025 ला निरोप देत 2026 चे स्वागत केले जाते. तसे मानले गेले तरी ऋतू प्रमाणे जर मानले गेले तर पाढवा हा हिंदू समाज बांधव नवीन वर्ष मानतो. पण या बदलत्या कॅलेंडर मुळे आजच नवीन वर्ष मानावे लागते. याच नवीन वर्षाचे औचित साधून बिलोली तालुक्यातील,हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नववर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ते, व वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष व शालेय समितीचे उपाध्यक्ष सय्यद मुजूभाई व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर,यांच्याकडून विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थी, व शाळेचे केंद्रप्रमुख नाईक सर, पत्रकार मारोती एडकेवार, डॉ. अण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर. ग्रामपंचायत सेवक सुनील अंजनीकर, व अजय कोंडलाडे सर,गायकवाड सर,ग्रामपंचायत सदस्य शेख गौस ,सेवक भिमराव एडकेवार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांचं,नववर्षानिमित्त शाळेकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले. नवंवर्षा निमित्त एकमेकांना,शुभेच्छा चा वर्षाव झाला,व सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आले. हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1/1/2026 नवीन वर्षाची सुरुवात एकमेकांच्या शुभेच्छांनी गोड गोड पदार्थाने झाली. ही परंपरा जोपसणारे आतापर्यंत च्या कालकिर्दीत शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष मनून पहिल्यांदा पार पडली असे गावातील नागरिकांनी कुजबुजत होती. मुज्जू भाई ने पुढे म्हणाले तुम्ही खूप शिका शिकून आपल्या आई बाबा, शिक्षक, शाळेचे तसेच गावचे नाव मोठे करा तुम्हाला जर काही अडचण आल्यास आम्हाला सांगा मग आम्ही शिक्षकांना सांगून त्यावर मार्ग काडू असे म्हणत त्यांनी सर्वानी शाळेत वेळेवर उपस्थित रहावे असे बोलून विद्यार्थी वर्गाला एक शिक्षणाबद्दल आवड निर्माण करून दिले.