देगलूर/प्रतिनिधी :-
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त व मराठी पत्रकार दिन तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक ‘खालापूर वार्ता’ आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, कार्यक्रमास पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, खोपोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, शिवसेना उत्तर रायगड महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे, जेष्ठ सहज सेवा फाउंडेशनच्या सागरिका शेखर जांभळे, खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक राहुल गायकवाड, संदीप पाटील, नगरसेविका सुवर्णा मोरे, न्युज जर्नालिस्ट असोसिएशन महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा इशिका शेलार उपस्थित होते.
यावेळी देगलूर येथील पत्रकार जावेद अहेमद यांचा खोपोली ( रायगड ) येथे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात आदिवासी महिलांना डस्टबिनचे वाटप करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनमध्ये करुणा कदम - खालापूर तालुका महिला अध्यक्ष, संजय पाटील - रायगड जिल्हा उपाध्यक्ष तर रविंद्र घोडके - रायगड जिल्हा सचिव यांचा समावेश होता.
या गौरवशाली कार्यक्रमास खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पत्रकारितेच्या मूल्यांना अभिवादन करणारा, सन्मान व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमास न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, कार्यक्रमास पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, खोपोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, शिवसेना उत्तर रायगड महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे, जेष्ठ सहज सेवा फाउंडेशनच्या सागरिका शेखर जांभळे, खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक राहुल गायकवाड, संदीप पाटील, नगरसेविका सुवर्णा मोरे, न्युज जर्नालिस्ट असोसिएशन महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा इशिका शेलार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, नांदेड जिल्हाध्यक्ष जावेद अहमद, सहजसेवा फाउंडेशन सागरिका जांभळे, खोपोली सचिव परमेश्वर कट्टीमणी आदी, पत्रकार नरेश जाधव, आकाश जाधव तय्यब खान, प्रविण कोल्हे, संतोष मोरे, संतोषी म्हात्रे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.





Social Plugin