देगलूर प्रतिनिधी - जावेद अहेमद
देगलूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोटरसायकल चोरी व इतर चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच शाळा व महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण व अवैध वाहतुकीचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीला आळा बसेल,
गेल्या अनेक महिन्यांपासून देगलूर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत याचा फायदा सरळ सरळ गुन्हेगारांना होत आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाला वारंवार तोंडी विचारून सुद्धा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ आज मुख्याधिकारी देगलूर यांना भेटले व ताबडतोब सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या संदर्भात निवेदन दिले.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे ताबडतोब न लावल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी प्रशांत दासरवार (शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी देगलूर), दिपक संगमकर (सरचिटणीस), भीमराव जोगावार (सरचिटणीस), मुकुंद भुताळे (उपाध्यक्ष), शिवकुमार डाकोरे (उपाध्यक्ष) सचिन कांबळे (बूथ प्रमुख) आदी पदाधिकारी उपस्थित होते.





Social Plugin