Ticker

6/recent/ticker-posts

आई अंजनीच्या द्वितीय पुण्यस्मरणाचा योग साधून "तिचं जगणं रोजंदारी "या कविता संग्रहाचे प्रकाशन.



  *ग्रामीण प्रतिनिधी -विश्वराज वाकोडे *


तामसा सर्कल कोंढुर येते आज माझी आई अंजनी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचा योग साधून " तिचं जगणं रोजंदारी " या माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन मूळगावी कोंढुर ता. हदगाव येथे करण्यात आले होते. माझ्या कविताचा गाभा हा ग्रामीण माणसाच्या दैनंदिन जीवनातील कथा व वेदना जगासमोर उजागर करणारा असल्यामुळे हा काव्यसंग्रह खेड्यापाड्यातील रोजंदारीचे जगणं जगण्याच्या माणसाच्या हातून प्रकाशित व्हावा अशी माझी मनोभावी इच्छा होती. म्हणून मी प्रत्यक्ष मोलमजुरी व रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या हातून या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले आहे. त्यामुळे आयुष्यभर रोजंदारी करणाऱ्या हाताच्या वेथा व वेदनांना खऱ्या अर्थाने त्याच हातांनी आपल्यासमोर प्रकाशित करता यावं मला मनोमन समाधान वाटत आहे.

     या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी बहीण अनुसया खूपसे, सुमनबाई राठोड,पार्वती बाई पिल्लेवार,शोभाबाई राठोड,लक्ष्मीबाई भिसे,सुवालीबाई राठोड, बेबीबाई भिसे,पंचफुलाबाई पवार,सयाबाई राठोड,केरबा वडपलवाड,अशोकराव भिसे, किशन धुमाळे,मनोज राठोड, जळभाजी डाखोरे,मारुती डाखोरे,विठ्ठल डाखोरे,नामदेव डाखोरे,चिकित्सा मानसशास्त्रज्ञ बालाजी खूपसे, अर्चना डाखोरे,आरती डाखोरे, सोनाली डाखोरे,प्राची डाखोरे, कधी उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे खूप खूप आभार मानले आहेत.