Ticker

6/recent/ticker-posts

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशी निर्मिती करावी------- कारंजा येथील आविष्कार महिला मंचाचा छान उपक्रम.

 



 गुणवंत राठोड कारंजा लाड (प्रतिनिधी) 

कारंजा येथील आविष्कार महिला मंचतर्फे दर महिन्याला महिलांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच अनुषंगाने या महिन्यात ललिता माकोडे, शुभांगी मराळे व राणी म्हतारामारे यांच्या वाढदिवसाचे तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ७ व ८ मार्च रोजी “टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. ८ मार्च रोजी समारोपीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. निशा गोलेच्छा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ. नीरज राय, सौ. मंगला झंझाड, सौ. मनीषा महाजन, सौ. वर्षा डांगूर, सौ. हर्षा दर्यापूरकर, सौ. शीतल काकडे, सौ. शालिनी जगताप उपस्थित होत्या.

या उपक्रमांतर्गत महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही मांडण्यात आले. सहभागी महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त सहसा विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो; मात्र त्या मागे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही. ही बाब लक्षात घेऊन आविष्कार महिला मंचाने यावेळी सर्व कार्यकर्त्यांचाही पाहुण्यांच्या हस्ते गौरव केला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अशा प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.