महाराष्ट्र ग्रामीण न्यूज/ गणेश जाधव
जागतिक महिला दिनानिमित्त डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने आयोजित ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ कार्यक्रम मलकापूर येथील भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला यामधे जामनेर जिल्हा जळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण न्युज चे प्रतिनिधी गणेश जाधव यांना सोशल मीडिया पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ प्रदान करण्यात आला.
यावेळी गणेश जाधव यांचे जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी .पो.हे कॉ. प्रकाश कोळी ( DY.SP.रायटर मलकापूर) एकनाथ महाले (नाभिक माऊली संघटना जामनेर). एकनाथ भाऊ पर्वते .संजय भाऊ महाजन. नारायण भाऊ वाघोदे. विजय लामखेडे. सौ. सरस्वती गणेश जाधव. (दर्पण न्यूज). सौ.सीमा शिवाजी पर्वते (आशा वर्कर.) कुमारी. मयुरी सुनील पर्वते . व जवळचे इतर लहान थोर मान्यवर उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते
त्यावेळी 782 प्रस्तावांपैकी निवड करून 219 मान्यवरांना ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ प्रदान करण्यात आला. यामधे शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिला शिक्षक, डॉक्टर, आषा सेविका, परिचारिका, यांना सुद्धा ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ देऊन गौरव करण्यात आला.
‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुनम कुलकर्णी (कृषी सहाय्यक अधिकारी ), कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, तर प्रमुख अतिथी डॉ. सुरेखा जैन तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. जयश्रीताई खर्चे पॅथॉलॉजिस्ट, डॉ. शारदा झवर, डॉ. मोनिका गोठी, डॉ. अंतिमा गोठी, डॉ. सुषमाताई गोठी, प्रा. संगीता अनिल खर्चे इंजिनिअरिंग कॉलेज लायब्ररीन, हे होते
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय ,कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जाधव मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र गणगे सर यांनी केले.

.jpg)




Social Plugin