पारनेर प्रतिनिधी
पारनेर येथे लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीला साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्त पारनेर येथे महाआरोग्य यज्ञ आयोजित केला होता आणि उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे मा.आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब ,नाशिक मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे साहेब आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व घटक ,सभापती ,उपसभापती ,संचालक ,नगरपंचायत चे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष ,तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख , युवा प्रतिष्ठान तसेच प्रत्येक गावचे सरपंच ,उपसरपंच ,चेअरमन आणि संचालक आणि अनेक लाभार्थी ,रुग्ण उपस्थित होते .
यावेळी मंत्री महोदय यांनी अवयव दान करणे बाबत माहिती देऊन ,लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांचे कौतुक करून ,वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.





Social Plugin