देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
दिनांक ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपल्या देशात साजरा केला जातो. ज्या महिलांनी झाशीच्या राणीसारखे, वीरमाता जिजामाता, महात्मा सावित्रीबाई फुले, अशा अनेक धडाधडीच्या व स्वातंत्र्य प्रेमी व देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिल्या त्या महिलांनी हा महाराष्ट्र घडवला हा देश घडवला या देशाला संस्कृतीची पावलं कशी उचलावी ते ह्या महिलांनी देशाला शिकवले अशा या दिवसाचा जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस ८ मार्च रोजी साजरा केला जातो. गाव पुरळ येथे आज ग्रामपंचायत कार्यालय पुरळ ग्रामपंचायत च्या वतीने आज महिला दिनाचा महिलांचा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजून तीस वाजता चालू करण्यात आला. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती श्री अनुश्री तावडे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. अनेक ग्रामपंचायतचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या कार्यक्रमाची आखणी ग्रामपंचायतचे कार्यकर्ते व स्थानिक सदस्य हे सहभागी असताना दिसले. महिला दिनानिमित्त कार्यक्रम असे ठेवण्यात आलेले होते की पहिला कार्यक्रम असा झाला की प्रस्तावना मांडण्यात आली, त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, अपंग महिलांचे सत्कार करण्यात आले त्यांचे सुद्धा मनोगत ऐकवण्यात आले, त्यानंतर योग्य पद्धतीने डॉक्टरांचे मार्गदर्शन व त्यांचे भाषण महिला कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ यांना सांगण्यात आले.
महिलांसाठी खास करून हळदीकुंकू हा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. त्यानंतर ग्रामपंचायत व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले होते. संगीत खुर्ची ही सुद्धा स्पर्धा ठेवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे महिलांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे सुद्धा वाटप करण्यात आले. व सर्व मान्यवरांचे व ग्रामपंचायत माननीय सरपंच सौभाग्यवती अनुश्री तावडे यांचे विचार महिला दिनानिमित्त महिलांना सांगण्यात आले. अतिशय मनोरंजन पूर्वक व उत्साहपूर्वक हा कार्यक्रम ग्राम पंचायत कार्यालय पुरळ येथे आनंदाने साजरा करण्यात आला. असा हा जागतिक महिला दिन महिलांच्या आशीर्वादाने व त्यांच्या संस्कृतीमुळे महाराष्ट्राला एक चांगलीच आगळीवेगळी दिशा मिळालेली आहे.अशा या महिलांना ज्या कर्तव्य दक्ष आहेत जे आपले कर्तव्य बजवतात व आपल्या संस्कृतीला जपता आहेत व संस्कृती सुद्धा घडवता येत अशा या महिलांना आमच्या कोकणी वासियांचा जागतिक महिला दिना शतशः प्रणाम व असेच ज्या काही महिला आहेत त्यांनी ह्या आपला उद्धार करून ह्या देशाला व महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेऊन वीर माता जिजामाता, महात्मा सावित्रीबाई फुले, झाशीची राणी आणि असे अनेक पराक्रम गाजवणाऱ्या महिलांना यांचे आदर्श घेऊन आपल्या महिलांनी या "जागतिक महिला" दिनाचा सन्मान करून "महिला दिनाची " उत्स्फूर्तता व आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वाढवावी असे अनेक मान्यवरांचे मत आहे. 🌸





Social Plugin