टेंभुर्णी प्रतिनिधी (जालना ) विष्णु मगर
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भोकरदनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, डॉ. श्रद्धा अनिल पैठणकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. 'संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई' (DMER) द्वारे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या MD/MS बाँडेड पोस्टच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत डॉ. श्रद्धा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ११ वा क्रमांक पटकावून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.
यशाचा टप्पा आणि वैशिष्ट्ये
मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (DMER) २ मार्च २०२६ रोजी ही गुणवत्ता यादी जाहीर केली. या अत्यंत कठीण आणि महत्त्वाच्या परीक्षेत राज्यभरातून हजारो गुणवंत डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये डॉ. श्रद्धा यांनी स्वतःचे स्थान अव्वल १०-१२ उमेदवारांमध्ये निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाने केवळ पैठणकर कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे.
परिश्रम आणि कौटुंबिक पाठबळ
डॉ. श्रद्धा यांची आई शारदा अनिल पैठणकर आणि संपूर्ण परिवाराने त्यांच्या या प्रवासात नेहमीच खंबीर साथ दिली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली, ज्याचे फळ आज या रँकिंगच्या रूपाने पाहायला मिळत आहे.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. श्रद्धा यांच्या या ऐतिहासिक यशानंतर सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष भेटीगाठीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. "आमची लाडकी डॉ. श्रद्धा, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे," अशा शब्दांत त्यांच्या निकटवर्तीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून, भावी डॉक्टरांसाठी त्या एक आदर्श ठरल्या आहेत.
डॉ. श्रद्धा अनिल पैठणकर यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन! महाराष्ट्र राज्य पातळीवर ११ वा क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे...माजी.केंद्रीय राज्य मंञी.रावसाहेब पाटील दानवे.
● डाॅ श्रध्दा शारदा अनिल पैठणकर (M.B.B.S.MD) -- वडील लहानपणी वारले परंतु माझ्या आई ने काबाडकष्ट करून,नौकरी करून,आम्हा तिन्ही भावंडाना योग्य दिशा व संस्कार करून शैक्षणिक व सामाजिक दृष्टिकोनातून आम्हास मेडीकल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून MBBS व मला MD केले याचा आम्हास सार्थ अभिमान आहे..शैक्षणिक क्षेत्रातील आमची आई ही शारदादेवीच आहे.तर सद्या मी बृहन्मुंबई महानगरपालिका शेठ वा.च. गांधी आणि मो.अ. व्होरा म.न.पा. सर्वसाधारण रुग्णालय ( राजावाडी रुग्णालय) घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे कार्यरत आहे --- डाॅक्टर श्रध्दा शारदा अनिल पैठणकर.भोकरदन. MBBS (MD PATHOLOGY )
● मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करताना प्रचंड अडचणी आल्या. त्यांनी खचून न जाता तिन्ही मुलांना डॉक्टर केले आहे.घरातील कर्ता पुरुष गेल्यावर काय अडचणी येतात हे मी अनुभवले आहे. शिक्षण झालेले होते; मात्र, ते असेपर्यंत केवळ चूल व मूल एवढेच काम मी करीत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. माझे आई-वडील, सासू सासरे व आमचा पूर्ण पैठणकर परिवार माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. मुलांच्या शिक्षणासाठी आता मुलगी श्रद्धा हीसुद्धा आर्थिक मदत करते. त्यामुळे थोडा ताण कमी झाला. तिन्ही मुले डॉक्टर झाली आहेत-- आई शारदा पैठणकर औषधनिर्माण अरोग्य विभागात सिल्लोड.
--------
पुढील वाटचालीस शुभेच्छा!
वैद्यकीय क्षेत्रातील ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहो आणि आपल्या हातून जनसेवा घडो, हीच सदिच्छा.





Social Plugin