Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड राजा तालुक्यातील ताड शिवणी गावामध्ये 135 वी भीम जयंती अति उत्साहात साजरी



महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात 

सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावामध्ये महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी भीम जयंती अत्यंत थाटामाटात व उत्साहात करण्यात आली सर्वप्रथम ताड शिवणी  येथील गावातील समता सैनिक दलातील सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मानवंदना देऊन जयंतीची सुरुवात करण्यात आली अत्यंत शिस्तीमध्ये व उत्सवामध्ये जयंतीची गावांमधून मिरवणूक काढण्यात आली  जय भीम चा घोषामध्ये जयंती पुढे पुढे जात कायद्याच्या शिस्तीमध्ये मिरवणूक दहा वाजता विहारात आणण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच पती कैलास भाऊ भूमकर तर ग्रामपंचायत सदस्य आसाराम राठोड संतोष फौजी देशमुख सिद्धेश्वर शिंदे वामनराव जाधव महिला सदस्य सुनिता खरात सावित्रीबाई खरात गावचे पोलीस पाटील गोविंद देशमुख पोलीस कॉन्स्टेबल काकड साहेब गावचे प्रतिष्ठित नागरिक भास्कर काका देशमुख तर युवा पर्व आता सर्व रवी भाऊ गाडेकर किशोर देशमुख मुकेश काळे  यांचा उचित मानसन्मान  पंचशील नवयुग मित्र मंडळातर्फे करण्यात आला सूत्रसंचालन सचिन खरात तर मार्गदर्शन जिव्हाळा फाउंडेशन संभाजीनगर सचिव ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ खरात यांचे तर्फे करण्यात आले कार्यक्रमाची सांगता त्रिशरण पंचशील घेऊन जयेंद्र खरात यांनी केली तर आभार प्रदर्शन पंचशील नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाश खरात यांनी केले