रांजणगांवदेवी ( प्रतिनिधी )
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे गोदावरी कॅटल फीड्स इंदौर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक हितेश शर्मा व महेद्रा चौधरी यांनी कुलस्वामिनी उद्योग समूहाला नुकतीच भेट दिली. यावेळी उद्योग समूहाचे मालक अमोल वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान पशुखाद्य व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील उद्योगवाढीच्या संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही उद्योगसमूहांमध्ये भविष्यात सहकार्य वाढवण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
अमोल वाबळे यांनी आपल्या उद्योग समूहाच्या कार्यपद्धतीची माहिती देताना स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावर समाधान व्यक्त करत हितेश शर्मा व महेद्रा चौधरी यांनी उद्योगाच्या प्रगतीबद्दल कौतुक केले.
दरम्यान, गोदावरी कॅटल फीड्सच्या संचालकांनी परिसरातील शेतकरी दत्तू वाबळे यांच्या गोठ्यालाही भेट दिली. यावेळी त्यांनी “गोदावरी कांडी पेड हे उत्पादन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी विकसित करण्यात आले असून, कंपनी गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे,” असे स्पष्ट केले.या प्रसंगी सोमनाथ कचरे, पत्रकार बाळासाहेब बोधक, चैतन वाबळे जितेद्र लोढे उपस्थित होते.या भेटीमुळे कुकाणा परिसरातील पशुखाद्य व औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin