
.देविदास वायाळ
लोणार तालुक्यातील अंजनीखुर्द महसूल मंडळातील संपूर्ण परिसरात १ एप्रिल रोजी अचानक झालेल्या हवामान बदलामुळे सुसाट्याच्या वाऱ्यासहित अतिमुसळधार पाऊस व गारपीट झाली. अंजनीखुर्द महसूल मंडळातील अंजनीखुर्द, खळेगाव,गुंजापूर, कारेगाव, महारचिकना,शिवणीपीसा, उदनापूर, वाल्हूर शिवारात दि. १ एप्रिल रोजी अचानक आलेल्या सुसाट्याच्या वाऱ्याने, मुसळधार पावसाने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, हळद, पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांचा रब्बी कांदा, हरभरा, गहू, हळद पिके काढणीच्या तोंडावर आलेले असताना मात्र गारपीट झाल्याने हाती काहीही लागणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.आधीच बँकांचे व शावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेल्या शेतकऱ्याची परीस्थितीमात्र आत्महतेपर्यंत निसर्गाने पोहचवली आहे.
अंजनीखुर्द महसूल मंडळ परिसरातील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे की अवकाळी पावसाने, गारपिटीने नुकसान झाल्याने सरकारने नुकसान भरपाई द्यावी.




Social Plugin