Ticker

6/recent/ticker-posts

सालगड्याचा मुलगा झाला राज्य कर सहाय्यक , शिंदेवाडीचा राजेंद्र पुजारी याची निवड , राज्यात १७वी रँक.

 


   बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

कर्नाटकातुन रोजगारानिमित्त आलेल्या व शिंदेवाडी ता . खटाव येथे स्थायिक झालेल्या सालगडी म्हणून काम करून स्वतः निरक्षर असताना सुध्दा  आपल्या मुलाला राज्य कर सहाय्यक पदी निवड करून सगळयांच्यासमोर आदर्श ठेवला आहे . राजेंद्र लिंगाप्पा पुजारी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या परीक्षेत राज्यात जनरल कॅटगरीत १७वी रँक मिळवत राज्य कर सहाय्यक ( राजपत्रित अधिकारी गट - क) अधिकारी पदावर यशस्वीपणे झेप घेतली आहे .

 1985 साली रोजगारानिमित्त कर्नाटक राज्यातून  आई - वडिल  महाराष्ट्रात आले अशा गरीबीच्या  परिस्थितीतून मुलांना शिक्षण दिले. आणि प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शिंदेवाडी येथे माध्यमिक शिक्षण आश्रमशाळा ताथवडा (फलटण) येथे व  महाविदयालयीन शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय  खटाव येथे झाले .व पदवीत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले.   लहानपणापासून शेतीकामाची ओळख, पहाटेची राव आणि मर्यादित साधनांमध्ये शिक्षण या वातावरणात राजेंद्रने देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. शेतात काम करून आलेल्या, दमलेल्या शरीराला विश्रांती न देता त्याने अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यांवर सातत्याने भर दिला. घरच्या जेमतेम परिस्थितीत शिक्षणाचा वारसा नसताना खेड्यात शैक्षणिक सुविधांची आबाळ अशा सर्वच बाजूंनी अनिश्चितता असताना पट्ट्याचा आत्मविश्वास कधी ढळला नाही. कठोर प्रशिक्षणाच्या काळात त्याने शिस्त, नेतृत्वगुण आणि सहनशक्ती यांचे उत्तम दर्शन घडवले.  लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परिक्षेत पद मिळविण्यासाठी सुरुवातीच्या काळात कोल्हापूर येथे तयारी केली. कोणत्याही क्लासेस शिवाय  सेल्प स्टडीने 2021 साली पहिल्यांदा मुख्य परिक्षेस पात्र झाला परंतु अंतिम यादीत निवड झाली नाही.

2021 पासून सलगपणे पाच मुख्य परिक्षा  दिल्या परंतु अपयशाने साथ सोडली नाही . मग डिसेबर 2024 साली झालेल्या MPSC गट-क च्या झालेल्या परिक्षेत यश मिळाले आणि त्याचा निकाल काल 6 एप्रिल रोजी लागला .. त्यामध्ये  संपूर्ण महाराष्ट्रात open General ( (खुल्या प्रवर्ग) तून 17 वी रँक मिळवित घवघवीत यश मिळविले. या प्रवासात आई-वडीलांचा सिंहाचा वाटा आहे. निरक्षर असुनही मुलाला नेहमी मानसिक आधार आणि विश्वास देत नेहमी पाठींबा दिला. त्याचबरोबर  जवळचा मित्र परिवार यांनी अपयशाच्या काळात सढळ हाताने मदत केली. या प्रवासात गावातील सर्वांनी नेहमीच साथ दिली. आणि माझ्या पाठीमागे नेहमी खंतीरपणे उभे राहिले असे राजेंद्र पुजारी याने सांगितले .

 या यशाबद्दल त्याचे  सरपंच माधुरी फाळके , उपसरपंच - अजय फाळके , तंटामुक्तीचे अध्यक्ष  दत्तात्रय फाळके ,बैलगाडा खटाव संघटना अध्यक्ष रविंद्र फाळके, माजी सरपंच  श्रीरंग फाळके . संतोष फाळके . नारायण गाडे, आशा फाळके , प्रेमला पवार, तानाजी फाळके, माजी उपसरपंच हणमंत फाळके , सुर्यकांत नलवडे, छाया गाडे ,सुनिता फाळके , शरद फाळके , लक्ष्मण फाळके, तेजेस फाळके, सुनिल फाळके, रणजित माने ,चेअरमन  विठ्ठल फाळके ,व्हा. चेअरमन विजय फाळके सर्व ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती आणि शिंदेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .