रिसोड प्रतिनिधी : प्रा डॉ विजय गायकवाड
कोपरगाव : कोपरगाव येथील ग्रामीण खेडे येसगावच्या एका सामान्य गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची मुलगी तसेच नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची विद्यार्थिनी कु स्नेहल अशोक आहेर हिची MPSC परीक्षेतून 'कर सहाय्यक' (Tax Assistant) पदी नुकतीच निवड झाली आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या व आईवडील शेतकरी असलेल्या स्नेहल हिने लहानपणी शाळेत असताना पाहिलेले स्वप्न जिद्दीने अखेर सत्यात उतरून आकाशाला गवसणी घातली आहे. स्नेहल BSc ला असतानाच अभ्यासात सातत्य ठेवत नियमित ग्रंथालयाच्या वाचनकक्षात न चुकता अभ्यास करत व पुढे त्याच महाविद्यालयात MSc micrbiology करत तिने हे यश बिना कोणतेही स्पर्धा परीक्षेचे वर्ग न लावता संपादन केले ही फार मोठी कौतुकाची बाब असून तिच्या या यशाबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की नियमित ग्रंथालयाच्या वाचनकक्षात पूर्ण दिवसभर अभ्यास करत असल्यामुळे हे शक्य झाले. या निवडीबद्दल तिचे श्री अनिल बाविस्कर सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय संभाजीनगर व प्रा डॉ विजय गायकवाड विभागप्रमुख स्व पुष्पादेवी पाटील कॉलेज रिसोड यांनी अभिनंदन केले असून कु स्नेहल व तिच्या गरीब शेतकरी कष्टकरी आईवडिलांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
.jpg)




Social Plugin