प्रतिनिधी
हिवरा गडलिंग ता सिंदखेडराजा या अतिदुर्गम खेडेगावातील शेतमजूर श्री तुकाराम चव्हाण यांची मुलगी रेश्मा तुकाराम चव्हाण हिने अगदी मोलमजुरी करून गावातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि काहीतरी मोठे होण्याची जिद्द कायम ठेवत वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जळगाव पोलिसात भरारी घेतली रेशमाची नियुक्ती थेट जळगाव पोलीस मध्ये झाली आहे.
तिच्या घरातील सगळं कुटुंब म्हणजे तिचे आई-वडील बहिण भाऊ हे सगळे लोक मोलमजुरी करत असतात रेश्मा सुद्धा त्यांच्यासोबत अधून मधून मोलमजुरी करण्यासाठी जात होती तरीसुद्धा तिने मनामध्ये जिद्द ठेवली की काहीतरी करायचे आणि ते तिन्ही सिद्ध करून दाखवले तिने आपले स्वप्न पूर्ण केले.
समाजातील मुलींना तिचे हेच सांगणे आहे की स्वप्न बाळगा मनात जिद्द ठेवा मेहनत करा आणि समाजाला पुढे घेण्यासाठी मुलींना पुढे या





Social Plugin