Ticker

6/recent/ticker-posts

येथील सुपुत्र तसेच जिजामाता विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील बापू फुलमाळी Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची Tax Assistant या पदासाठी निवड झाली आहे.



 संतोष फुलारी @ग्रामीण प्रतिनिधी भेंडा (ता. —)

 येथील सुपुत्र तसेच जिजामाता विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील बापू फुलमाळी यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची Tax Assistant या पदासाठी निवड झाली आहे.

सुनील बापू फुलमाळी यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून अभ्यासाची सुरुवात केली. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी कधीही हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. त्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा आणि आत्मविश्वास यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या यशामुळे भेंडा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच जिजामाता विद्यालयाचे शिक्षक यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळणार असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

याचबरोबर सुनील बापू फुलमाळी सध्या पुढील Forest Range Forest Officer Exam (Forest RFO) मुख्य परीक्षेची तयारी करत असून, त्यासाठीही त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 💐🎊