बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्री वर्धनी विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९१.७० टक्के लागला असून, कु. अनुष्का महादेव सावंत हिने ९५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहेकु. अनुष्का महादेव सावंत - ९५.४०% (प्रथम)कु. ईश्वरी धनाजी पाचंगणे- ८७.४०% (द्वितीय) कु. वैष्णवी दत्तात्रय खवळे- ८२.४०% (तृतीय)
या अभूतपूर्व यशाबद्दल उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुखांचे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भरत फडतरे सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदांमध्ये श्री. कदम सर, श्री. शिंदे सर, श्री. माने सर, सौ. मुलाणी मॅडम, श्री. खाडे सर आणि श्री. सोनटक्के मामा यांचा मोलाचा वाटा आहे.
या यशाबद्दल स्कूल कमिटी सदस्य श्री. अर्जुन मोहिते, स्कूल स्थापना कमिटी, सखी सावित्री समिती, प्राध्यापक तुकाराम सावंत, सोसायटीचे चेअरमन निलेश जाधव, व्हाईस चेअरमन किशोर सावंत, उमेश चव्हाण, दीपक कोठावळे,पत्रकार निसार श्री. शिकलगार, अकबर भालदार, नितीन घोरपडे सर, संतोष कुंभार, शंकर घोरपडे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहित स्वामी,सुधीर खवळे, प्रणव कुंभार, सरफराज शिकलगार, विकास चव्हाण, आणि सर्व पालकांसह गावातील सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे वर्धनगड परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.





Social Plugin