Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मधून कु श्रेया लोहार विद्यालयात प्रथम .

 








बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर बुध मधून कु . श्रेया वैभव लोहार  92.40, कु . तीर्थ राजेंद्र सुर्यवंशी  92.20, कु. अस्मिता चंद्रकांत चव्हाण 88.00 ,कु . तन्वी विकास  पात्रेकर 86 .00  व कु . तन्वी राजेंद्र म्हेत्रे  85.20 गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत .विद्यालयाचा निकाल 90.20% लागला असुन विशेष प्रावीण्य 22 , प्रथम श्रेणी 15, द्वितीय श्रेणी 33, पास श्रेणी 1विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य अंकुश भांगरे सरपंच सुजाता बोराटे उपसरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयराजे घाटगे,पत्रकार प्रकाश राजेघाटगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य चंद्रकांत चव्हाण ,दयानंद जगदाळे व इतर सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . तसेच बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यानी देखील अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .