Ticker

6/recent/ticker-posts

गोंदेगाव शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी अनुरूध्द वाघ .



जालना प्रतिनिधी विष्णु मगर

गोंदेगाव तालुका जालना येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीच्या निवड समितीसाठी पालक सभा बोलावण्यात आली होती.  पालकांमधून हसतखेळत सर्व समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी   श्री  अनिरुद्ध बबन वाघ तर उपाध्यक्ष म्हणून श्रीमती अनिता देवानंद वाघ यांची निवड करण्यात आली असून,  कार्यकारणी  सदस्यांमध्ये श्री राहुल बाबुराव बोर्डे, श्री रावसाहेब अंकुश वाघ, श्री अनुरथ बबनराव वाघ, श्रीमती शितल उदय दीक्षित , श्री गजानन अण्णा वाघ, श्रीमती वर्षा देवानंद वाघ, अनिल शेषराव वाघ , श्रीमती ज्योती मनोहर वाघ यांची तर श्री बाबासाहेब फकीरबा वाघ सर यांची शिक्षण तज्ञ ,श्री बंडू शेषराव वाघ ग्रामपंचायत सदस्य , विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी प्राची गजानन वाघ, 

कुमार सक्षम अरुण वाघ, शिक्षक प्रतिनिधी म्हणून  श्री दीपक क्षीरसागर , सचिव म्हणून श्री पी .बी .बोडके यांची निवड करण्यात आली. या शालेय समितीच्या सर्व पदाधिकारी यांचा  गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी गावातील सांडु मगर, सरपंच संजय वाघ, राजु वाघ, बद्रीनाथ वाघ, बाबासाहेब पाखरे यांच्या सह विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.