( ग्रामीण प्रतिनिधी आरिफ खान )
साकळी येथील नामांकित शिक्षण संस्था 'अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज' च्या मुख्याध्यापकपदी मोहम्मद फारूक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून आणि साकळी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मोहम्मद फारूक यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि संस्थेप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन व्यवस्थापन समितीने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
आपल्या निवडीनंतर बोलताना मोहम्मद फारूक यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देणे आणि विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अविरत प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.





Social Plugin