Ticker

6/recent/ticker-posts

अखेर गुजरीचे ग्रामस्थ विजयी! प्रशासन झुकले; ग्रामसेविकेने शाळा स्थलांतर NOC ग्रामसभेत रद्द केली



*राळेगाव | गुजरी - ग्रामीण प्रतिनिधी स्वप्नील घोटेकर*

राळेगाव तालुक्यातील मौजा गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतर प्रकरणात अखेर ग्रामस्थांचा विजय झाला आहे. दि. 27/04/2026 रोजी ग्रामसेविका विजया पाटील फसवणुकीने काढलेल्या NOC चा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत एकमताने रद्द करण्यात आला.

*कसे झुकले प्रशासन?*

गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थांनी BDO, CEO ZP, शिक्षणाधिकारी,  "महाराष्ट्र ग्रामीण न्यूज" चे ग्रामीण प्रतिनिधी स्वप्नील घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली 125 ग्रामस्थांनी 125 सह्यांसह सादर केला होता. 

कलम 39(2) नुसार निलंबनाचा दबाव आणि पत्रकारितेच्या माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला झुकावे लागले. आजच्या ग्रामसभेत ग्रामसेविका विजया पाटील यांनी दि. 27/04/2026 ची NOC रद्द करण्याचा ठराव मंजूर केला.

*ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या मान्य:*

1. बनावट NOC तात्काळ रद्द 

2. शाळा स्थलांतर प्रक्रिया स्थगित 

3. राजश्री शाहू महाराज विद्यालय गुजरी येथेच कायम

4. दोषींवर शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव CEO कडे

*ग्रामस्थांची प्रतिक्रिया:*

"21 मे 2026 ला आम्ही महाभारत सुरु केले होते. आज विजय झाला. गावातील होतकरू तरुणांचा 'गुजरी ग्राम विकास मंच' दररोज गावावर लक्ष ठेवणार आहे" 

या विजयामुळे संपूर्ण राळेगाव तालुक्यात ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे हात टेकले आहेत.

 वडाखाली भरलेल्या ग्रामसभेत NOC रद्द करण्याचा ठराव मंजूर करताना गुजरीचे ग्रामस्थ.