Ticker

6/recent/ticker-posts

जिमखाना पिंपोडे प्रीमियर लीग उत्साहात संपन्न; ३२ संघांचा सहभाग, गुणवंतांचा गौरव....



पिंपोडे बुद्रुक, दि. ३ : ता कोरेगाव, जि सातारा,

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य संधी व व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. विविध क्रीडा स्पर्धांमुळे त्यांच्या प्रतिभेला वाव मिळतो आणि भविष्यातील खेळाडू घडतात, पि़पोडे जिमखाना असो. विविध खेळांच्या स्पर्धा भरवून खेळाडूना व्यासपीठ देत असते.असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी केले.

जिमखाना असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय पिंपोडे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार भोसले, तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल शेळके, पं.स.सदस्या रूपालीताई साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती पद्मा जाधव, नगरसेवक सुशांत महाजन, सरपंच दीपिका लेंभे, सरपंच नारायण सावंत, उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सचिन लेंभे, करंजखोप हायस्कूलचे ग्रंथपाल मनोज लेंभे (सर), विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव लेंभे, प्रितम कदम, ऍड. किशोर खराडे, श्री संजय लेंभे, रामभाऊ दगडे, जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम, सचिन लेंभे, रणजीत लेंभे,दि़गबर निकम, उत्तम शिंदे, दत्तात्रय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात सनराईज अकॅडमी लोणंद या संघाने विजेतेपद पटकावले. गतविजेता नागेश्वर क्रिकेट क्लब, बावडा यांना द्वितीय क्रमांक मिळाला, तर श्री गणेश क्रिकेट क्लब, पिंपोडे बुद्रुक तृतीय आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब, निगडी चतुर्थ क्रमांकावर राहिले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळासाठी भानुदास शेळके, साहिल पवार, हणमंत शेळके व विकी बंडलकर यांना गौरविण्यात आले. नेटके नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजन ही या स्पर्धेची विशेष वैशिष्ट्ये ठरली. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) करण्यात आले होते. समालोचनाची धुरा सतीश भोसले,अमित वाघाबरे, सचिन लेंभे यांनी सांभाळली, तर पंच म्हणून दिगंबर निकम,सचिन लेंभे, अक्षय लेंभे व चैतन्य येळे, अमोल कांबळे, अभि ले़ंभे यांनी काम पाहिले.

यावेळी विविध क्षेत्रात निवड झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी व राष्ट्रीय, राज्यस्तरीय,  क्रीडा क्षेत्रात यश मिळवणारे खेळाडू तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन लेंभे (सर) यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप कदम, सचिन लेंभे, दिगंबर निकम, रणजित लेंभे,अभिजीत लेंभे, अमोल निकम, अमोल कांबळे, तानाजी जगदाळे. उत्तम शिंदे, दत्तात्रय पवार,राजेंद्र दगडे,मोहन नाचण तसेच आजी-माजी खेळाडूंनी व क्रीडाप्रेमिनी विशेष परिश्रम घेतले.


प्रतिनिधी :आदिनाथ धुमाळ