प्रतिनिधी : कैलास कोल्हे
मंठा : मराठा सेवा संघ, मंठा यांच्या वतीने गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी नानशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर तसेच गावातील मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पर्यावरण संवर्धन व निसर्ग संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांना "निसर्ग वाचवा, भविष्य घडवा" हा संदेश देण्यात आला. तसेच प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.





Social Plugin