Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत विसापूर शाळेची राज्यस्तरीय भरारी तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे  ] 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे वतीने फेब्रुवारी-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेत विसापूर शाळेच्या अर्णव ज्ञानेश्वर धायगुडे याने २७६/३०० गुणांसह राज्य गुणवत्ता यादीत ११ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारा खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील अर्णव हा एकमेव विद्यार्थी आहे. यापूर्वी त्याची सैनिक स्कुल, सातारा व जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे.

येथील सार्थक लालबहादूर साळुंखे (२४४/३००) आणि स्नेहा सुजित कदम (२३८/३००) यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा व गावाचा लौकिक वाढवला आहे.

रुही कदम, अनन्या साळुंखे, ईश्वरी साळुंखे, विघ्नेश जाधव, कृष्णा ढोले, सायली सावंत, अभय गायकवाड, प्रज्ञा साळुंखे, सुमित कदम, आयुष साळुंखे, गायत्री साळुंखे, आरोही फडतरे, श्रेया शिंदे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर धायगुडे, वैशाली नांदे, स्वाती जगताप, शुभांगी शितोळे, रेश्मा बोडरे, अनिल साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. 

जिल्हा परिषद अध्यक्षा .प्रियाताई शिंदे, शिक्षण सभापती . तेजस्विनी कदम, महिला बालकल्याण सभापती .लताताई कर्णे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, पंचायत समिती सदस्या .शामलीताई साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, केंद्रप्रमुख .रमेश सूर्यवंशी, डॅनफॉस कंपनीचे व्यवस्थापक मा.नवनाथ साळुंखे, मा.सरपंच निलम जगताप, उपसरपंच राजेश ढोले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल साळुंखे, उपाध्यक्ष गणेश सावंत, मुख्याध्यापक लतिका कर्पे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.