प्रतिनिधी मोखाडा सौरभ आहेर
पोशेरा ग्रामपंचायत मधील रस्त्यांचे सिमेंट- काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. गल्लोगल्लीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे; मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे काही ठिकाणी सुरू आहेत, यावर अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे दिसते. पोशेरा आदिवासी वस्तीत काम पाहता याची प्रचीती येते. या कामामुळे रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. काही रहिवाशी याची तक्रार मनसेचा पदाधिकारी याचा कडे केली असता मनसे शिष्ट मंडळ यांनी कामाची पाहणी केली असता. निकृष्ट दर्जाचे काम सुरु असले चे दिसले त्या नंतर असं लक्षात आले की या कामाला अद्याप कोणती प्रशासकीय मान्यता नाही.
कंत्राटदार घाईघाईत करत असल्याचे चित्र काही भागांत दिसून येत आहे. रस्त्यावरील कामात दगडी गोटे वापरून तेथे सिमेंट काँक्रीटीकरणाचा मलबा टाकला जात आहे. यात कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाही आहे.. नेमके कोणत्या स्वरूपाचे हे रस्त्याचे काम आहे. कोण कंत्राटदार येथे काम करत आहे याची माहिती द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. मोखाडा तालुका मनसे पदाधीकारी याचा कडून समंधित अधिकारी आणि ठेकेदार याचा वर गुन्हा नोद व्हावा या साठी मागणी करण्यात आली आहे.२४ तासात गुन्हा नोद झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून मनसे तालुका अध्यक्ष निलेश फुपाणे,उप तालुका अध्यक्ष निलेश कोरडे, शहरध्यक्ष अशोक सालकर,मनविसे अध्यक्ष नागेश पवार , जयवंत वाजे याचा कडून या कामा संदर्भात चौकशी व्हावी या साठी निवेदन देण्यात आले.





Social Plugin