ग्रामीण प्रतिनिधी ,,, मोहम्मद रफी मदार आदमपूरकर
मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील अल्ताफ एकबाल शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राज्य राखीव पोलीस दल (SRPF), जालना येथे निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुखेड-कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अल्ताफ यांचे वडील इकबाल शेख हे लाकूड फोडून व विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही.
स्वतःच्या कष्टाच्या बळावर अल्ताफ यांनी होमगार्ड म्हणून कार्यरत राहून मुखेड पोलीस ठाण्यात सेवा बजावली. नोकरी सांभाळत सातत्याने अभ्यास व मेहनत सुरू ठेवली आणि अखेर राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) निवड होण्याचे स्वप्न साकार केले.
सत्कार समारंभात इकबाल शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर आमदारांच्या हस्ते अल्ताफ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले, "चांडोळा गावातील युवक-युवतींनी शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देऊन विविध क्षेत्रांत यश मिळवावे. आपल्या आई-वडिलांसह गावाचे नाव उज्ज्वल करावे. कोणतीही अडचण आल्यास आपल्या तालुक्याचा आमदार म्हणून मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे."
यावेळी खुशाल पाटील उमरदरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, संतोष बोंडलेवाड, व्यंकटराव जाधव, बालाजी पा. सकनुरकर, हणमंतराव नरोटे, डॉ. रंजित काळे, सुधीर चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील पाळेकर, दत्ता पाटील बेटमोगरेकर, किरण पाटील जाहूरकर, बाळू नाईक, मोहन गायकवाड, नागनाथ पंदिलवाड, दताजी डुबुकवाड, जयपाल वाघमारे, अदनान पाशा, राजुपाटील उंद्रीकर ,शिवलिंग नाईक, साहेबराव वाघमारे ,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंडेराव गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन इकबाल शेख यांनी केले.





Social Plugin