बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 युवकांनी तंदुरुस्त राहायला हवे. सकस आहार,नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. चुकीच्या व्यक्तींचा सहवासात न येता आपल्या आई-वडिलांचे गुरुजनांचे संस्कार जपावेत. कायद्याचे पालन करावे. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीजागरूक राहून पोलीस विभागाला मदत करावी. असे केल्यास  आपण इतरांना आदर्श ठराल,असे मत पुसेगाव पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अझर शेख  यांनी व्यक्त केले.  श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल जुनियर कॉलेज पुसेगाव येथे निर्भया पथक अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात   ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

 पोलीस कॉन्स्टेबल सौ.सत्रे मॅडम यांनी पोलीस काका, पोलीस दीदी याविषयी माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल कु.अमृता चव्हाण यांनी सायबर क्राईम विषयी माहिती दिली.गोपनीयचे पोलीस कॉन्स्टेबल दऱ्याबा नराळे यांनीचांगली वर्तणुक या विषयावर मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल कदम मॅडम, शिंदे मॅडम, श्री जाधव,प्राचार्य श्री गोपने डी. एन.,पर्यवेक्षिका सौ लाड, प्राध्यापक जे.बी. जाधव, मुख्याध्यापिका सौ खटावकर एन. बी.,राहूल शेवाळे, विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले  प्रा. पी. एच.घनवट यांनी आभार मानले.