Ticker

6/recent/ticker-posts

वणी शहरात १३ ऑगस्टला भव्य 'तिरंगा रॅली'चे आयोजन; देशभक्त नागरिकांचा पुढाकार



मुन्ना विठ्ठल येरेकार ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्यूज

"हर घर तिरंगा... हर मन तिरंगा" आणि "तिरंगा आहे अभिमान, ठेवू त्याचा सदैव मान" या भावनेतून वणी शहरामध्ये समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने भव्य 'तिरंगा रॅली' चे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रेमाची लाट निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात येत आहे.

रॅलीची वेळ आणि स्थळ:

दिनांक: १३ ऑगस्ट

वेळ: सकाळी ०९:०० वाजता

प्रारंभ स्थळ: विश्राम गृह, वणी

रॅलीचा मार्ग:

ही भव्य रॅली विश्राम गृह येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करेल:

१. विश्राम गृह

२. छत्रपती शिवाजी महाराज चौक

३. खाती चौक

४. महात्मा गांधी चौक

५. संत गाडगे बाबा चौक

६. शहीद भगतसिंग चौक

७. सर्वोदय चौक

८. रवींद्रनाथ टागोर चौक

९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

१०. लोकमान्य टिळक चौक

नागरिकांना सहभागाचे आवाहन:

"एकच ध्यास... राष्ट्र प्रथम! वंदे मास्तरम्!" हा संदेश देत वणी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी, तरुणांनी व देशभक्तांनी या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन समस्त देशभक्त नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.