मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधीमहाराष्ट्र ग्रामीण न्यूज वणी
_९ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जाणारा 'जागतिक आदिवासी दिन' यंदाही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थितांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन करून झाली. या प्रसंगी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि आदिवासी समाजाच्या संघर्षाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात वक्त्यांनी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, जल-जंगल-जमिनीचे रक्षण आणि शिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयांवर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकावे आणि आपल्या हक्कांप्रती जागरूक राहावे, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
या मार्गदर्शन व अभिवादन सोहळ्याला परिसरातील नागरिक, युवक, बालके तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने व उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.





Social Plugin