ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम बडूर येथील रहिवासी तथा सौ.मंजुळाबाई माध्यमिक विद्यालयाचे कृतीशील जिज्ञासू पदवीधर सहशिक्षक व शाळेचे पर्यवेक्षक शिवदास पार्वतीबाई राजयप्पा मठपती हे नियत वयोमानानुसार जुलै अखेरीस अध्यापक सेवेतून सेवानिवृत झाले आहेत.
मठपती सरांचा जन्म व प्राथमिक शिक्षण बडूर,ता. बिलोली येथे तर माध्यमिक शिक्षण महर्षी कर्वे विद्यालय डोणगांव खुर्द,सन १९८६ साली दहावी उत्तीर्ण होऊन पुढे यशवंत महाविद्यालय उमरी येथे विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शैक्षणिक शिक्षक पदविका एम.ए.डी.एड्.आणि बी.एड्.झाल्यानंतर दि.२३ जून १९९० साली सौ.मंजुळाबाई माध्यमिक विद्यालयात अध्यापक सेवेला प्रारंभ केला.काही काळ नांदेड जि.प. सहशिक्षक म्हणूनही त्यांनी शासकीय नौकरी केलेली होती.
पदवीधर माध्यमिक शिक्षक म्हणून संस्थेत सेवा करताना अल्पावधीत शिस्तबद्ध,अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून लौकिक मिळविला.इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयात ते अधिक पारंगत होते. शाळेचे पर्यवेक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली आहे.मुलांना तसेच विद्यालयातील सहकारी शिक्षकांना,पालकांना हवेहवेसे वाटणारे विनम्र,मृदु स्वभावाचे हसतमुख व्यक्तिमत्त्व असल्याची जाणीव आजही उजागर होते.सेवानिवृत्त निमित्ताने संस्था सचिव,अध्यक्ष,विद्यमान पदाधिकारी,साई शिक्षण मंडळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग पालक,बडूर, खतगांव गावकरी,असंख्य माजी विद्यार्थी, मठपती कुटुंबीय व आप्तस्वकीय मिञ परिवार यांनी आरोग्यदायी शुभेच्छां देत अभिनंदन करीत आहेत.





Social Plugin