Ticker

6/recent/ticker-posts

मानधनासाठी रोजगार सहाय्यकांचा एल्गार; ३ ऑक्टोबरपासून पालघर जिल्हा बंदचा इशारा (उपजिल्हाधिकारी रो.ह.यो पालघर)




पत्रकार :गावित चंद्रकांत 

ग्रामीण प्रतिनिधी बोरशेती 

दि:२९ सप्टेंबर २०२६

२ ऑक्टोबरपर्यंत प्रलंबित मानधनाचा प्रश्न मार्गी काढण्याची मागणी; अन्यथा कामबंद आंदोलन

पालघर : जिल्ह्यातील रोजगार सहाय्यकांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी रोजगार सहाय्यक संघटनेने केली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत मानधनाचा प्रश्न मार्गी काढावा, अशी मागणी जिल्हा रोजगार हमी योजना (रो.ह.यो.) अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या मुदतीत मानधनाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर ३ ऑक्टोबरपासून पालघर जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोजगार संघटनेचे अध्यक्ष जयराम नडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत रोजगार सहाय्यक महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, त्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न कायम असल्याने संघटनेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

मानधनासाठी रोजगार सहाय्यकांना वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन २ ऑक्टोबरपर्यंत प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, २ ऑक्टोबरपर्यंत मानधनाचा प्रश्न मार्गी लागला, तर पुढील आंदोलन टळेल; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून पालघर जिल्ह्यात कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे रो.ह.यो. विभाग आणि जिल्हा प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेतात, याकडे रोजगार सहाय्यकांचे लक्ष लागले आहे.