शहादा दिनांक १३/८/२०२६ (अशोक पाटील)
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की गुजर समाजाचे सुपुत्र *क्रिश पाटील* यांनी अवघ्या 12 व्या वर्षी इंग्रजी भाषेत "*KYRO SQUAD: Mission Battle for Peace*" हे पुस्तक लिहून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
चिरंजीव क्रिश हे *श्री. रोहितकुमार पाटील व सौ. स्मिताबेन पाटील (मूळ गाव:पाडळदा, हल्ली मुक्काम: दोहा, कतार)* यांचे सुपुत्र आहेत. ते स्वर्गीय श्री. रतीलाल वेडू पाटील (पाडळदा) तसेच डॉ. श्याम नथ्थू पाटील (डामरखेडा, हल्ली मुक्काम नागपूर) यांचे नातू आहेत.
विशेष बाब म्हणजे, वयाच्या केवळ 11व्या वर्षी क्रिश यांनी आपल्या आईसमोर एक कल्पना व्यक्त केली. त्या कल्पनेला त्यांच्या आईने अथक परिश्रम, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची जोड देऊन आज पुस्तकाच्या रूपात साकार केले आहे.
क्रिश यांनी या पुस्तकाच्या लेखन प्रवासात आपले वडील रोहितभाई तसेच मोठी बहिण कु.नक्षत्रा (COEP, Pune) यान्चे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे नमूद केले आहे.
या लहान वयात केलेल्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि भविष्यातील लेखनासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी, आपण सर्वांनी कृपया खालील लिंकवरून हे पुस्तक खरेदी करावे व आपल्या मित्रपरिवारातही ही माहिती शेअर करावी.
📖 पुस्तक खरेदीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे
👉
*1.Notion press*
https://notionpress.com/in/read/kyro-squad-mission
*2.Amazon लिंक:*
👉 https://share.google/rEWGZsrqF5znyOcQU
आपले प्रोत्साहन, शुभेच्छा आणि आशीर्वाद यांमुळे चिरंजीव क्रिशचे मनोबल निश्चितच वाढेल आणि भविष्यातही त्याला असेच उत्कृष्ट लेखन करण्याची प्रेरणा मिळेल.
🙏 क्रिश पाटील यांस मनःपूर्वक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक मंगलकामना! 🙏🌹






Social Plugin