🌺 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के🌺 महाराष्ट्र ग्रामीण न्युज 🌺
दिनांक 25 -9- 2026 वार शुक्रवार अनंत चतुर्थी या दिवशी असल्याने अनेक ठिकाणी कोकणामध्ये व अनेक भारत देशामध्ये आज गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात व थाटामाटात पाहण्यात आले. अनेक गणेश भक्तांनी आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत भक्ती भावाने आपल्या बाप्पाचा निरोप आज घेतलेला आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशे लेझीम फटाक्यांचा आवाज गणपती बाप्पाला सोडण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडीची आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे भजने नाच गाणी महिलांच्या फुगड्या अशी अनेक लेझीम पथके व त्यांचे नाच सुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ठेवण्यात आलेले होते. असा हा आगळावेगळा क्षण समुद्र किनाऱ्यावर व नदीकाठी अनेक मुंबईतील चाकरमानी व पर्यटक यांना पहावयास मिळालेला आहे. अनेक गावांमध्ये व खेडोपाडी गणपती विसर्जनाच्या वेळी त्यांची पूजा अर्चना करून आरती म्हणून व शेवटचा निरोप घेताना गावकऱ्यांची जी गाराणी आहेत ती म्हणून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे. अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पा आम्हाला सुख समाधान शांती द्यावे आमची व्यवस्थित रखवाली व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना अनेक गणेश भक्तांनी केलेली आहे. कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा हा सण अतिशय उत्साहवर्धक व भक्तिभावाने साजरा केला जातो ठिकठिकाणी त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण महा पूजेचे सुद्धा आयोजन केलेले असते अनेक ठिकाणी गणेश भक्ता भक्तांची जी गणपतीला साकडे असतात जे नवस असतात ते या दिवसात पूर्ण केले. अशा या सणाचे महत्व काय औरच आहे. अनेक खेड्यापाड्यात त गावागावात गणेश चतुर्थीचे भक्तजन जे आलेले आहेत ते अतिशय हिराहिरीने व श्रद्धापूर्वक काम करताना दिसलेले आहेत अनेक ठिकाणाची मंडळातले कार्यकर्ते हे सुद्धा प्रामाणिकपणे व शिस्तबद्ध आणि श्रद्धेपूर्वक गणेश भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करताना दिसलेले आहेत. ज्या ठिकाणी गौरी गणपती विसर्जन आहे अशा ठिकाणी सुद्धा काय मजा वेगळीच दिसलेली आहे महिलांमध्ये उत्स्फूर्तपणे उत्साह हा या दिवसात दिसण्यात आलेला आहे. असा हा सण मनाला हिरावून जाणारा असा आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना अनेक गणेश भक्तांना दुःख होताना व त्यांच्या डोळ्यात अश्रू येताना दिसलेले आहे. आणि गणपती बाप्पाचे विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना दिसले. असा हा सण अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जनाचा सण गणेश भक्तांच्या काळजाला व मनाला भेदवून जाणारा असा आहे. या श्री गणरायाचे विसर्जन करताना अनेक लहान मुले मुली, अबाल वृद्ध व महिला, गोरगरीब, लहान मोठा असा भेद न करता सर्व गणेश भक्त श्री गणरायाच्या विसर्जनासाठी सज्ज होताना दिसले. ठीकठिकाणी समुद्रकाठी व नदीवर पोलिसांची चोख सुरक्षकता व्यवस्था राखण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा याचा सुद्धा उपयोग केलेला आहे. पोलीस सुरक्षा यंत्रणेने आपले काम चोख रीतीने बजावलेले आहे व बजावत आहेत. अनेक गणेश मंडळांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचा व्यवस्थितरित्या पाहुणचार करून श्री गणरायाची शोभा वाढवलेली आहे. असा हा गणपती विसर्जनाचा सण अखंड भारत मध्ये अत्यंत उत्साहात व आनंददायक असा दिसतो. आपल्या भारतीय संस्कृतीला शोभणाऱ्या अशा काही गोष्टी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ह्या देखाव्यानिमित्त अनेक भारतीय संस्कृतीचे देखावे गणेश भक्तांना दाखवण्यात आलेले आहे. काही ठिकाणी गावागावात श्री गणरायाचे विसर्जन करताना होडींचा सुद्धा वापर केलेला आहे. असा हा गणपती विसर्जनाचा सण बारा दिवसाचा जो या दिवशी आलेला आहे तो केव्हा गेला हे गणेश भक्तांना ही समजलेले गेलेले नाही याचे कारण असे की हे दिवस केव्हा जातात श्री गणेशाच्या भक्तीमुळे व त्याच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे दिवस समजतच नाही म्हणून असा हा सण वारंवार यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपल्या लाडक्या श्री गणरायाला एकच मागणं असं करतो की सर्व गणेश भक्तांना सर्व नागरिकांना सुख समाधान शांती ऐश्वर्य भरपूर धन लाभ द्यावं व त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हावा ही श्री गणरायांकडे सर्व गणेश भक्तांची प्रार्थना. 🌺 महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 🌺





Social Plugin