Ticker

6/recent/ticker-posts

*चिखली तालुक्यातील स्काऊट,गाईड साठी एक दिवसीय संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न.......*



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

 बुलढाणा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक, बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी स्काऊट गाईड विद्यार्थ्या करिता एक दिवसीय संघनायक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री. शिवाजी अध्यापक विद्यालय चिखली येथे करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात उद्घाटक म्हणून मा. डॉ.पी.एस. वायाळ जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट, अध्यक्ष मा.डॉ.संजय पाठेन, प्राचार्य श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, चिखली तसेच मार्गदर्शक म्हणून मा.श्री. आर. यु. शिंगणे सर सहा.जिल्हा आयुक्त स्काऊट, मा. श्री. सुधाकर साखरे जिल्हा संघटक (स्काऊट), श्रीमती कविता पवार जिल्हा संघटक (गाईड), श्रीमती साधना मुळे मॅडम, श्रीमती रत्ना जाधव मॅडम, श्री. ढोकणे बाबुजी,श्रीमती संध्या उरसाळ मॅडम, श्रीमती सुनिता जाधव मॅडम, श्रीमती लहाने मॅडम, श्री. सचिन मस्के सर , श्री.विनोद सावडे सर, श्री . कुटे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

        कार्यशाळेमध्ये अभ्यासक्रमावर आधारित माहिती, चळवळीचा इतिहास, प्रार्थना, झेंडागीत, नियम, वचन, ध्येय, खूण, हस्तांदोलन, संघ पद्धती,संघ खून, संघ गीत, गाठीचे प्रकार, बंधने, स्ट्रेचर तसेच बांधण्या इत्यादी चे मार्गदर्शन स्काऊट, गाईड यांना देण्यात आले.  

      संघनायक प्रशिक्षण शिबिरामध्येमोठ्या संख्येने स्काऊट, गाईड व स्काऊटर गाईडर उपस्थित होते. संघनायक प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. ए.पी. अंभोरे सर, श्री. पी व्ही लांडे सर, श्री. प्रवीण टेंबरे सर,श्रीमती माया जाधव मॅडम, श्रीमती षष्ठी सोनूने, श्रीमती कविता शेळके, श्रीमती उज्वला लोखंडे तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री प्रवीण बागडे , श्रीमती निलिमा भोजेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.