Ticker

6/recent/ticker-posts

🌺 कोकणातील पाच दिवसाचे गणपती व गौरी गणपती विसर्जन थाटामाटात🌺




🌺 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 🌺

महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 🌺

कोकणातील पाच दिवसाचे व गौरी गणपती विसर्जन हे थाटामाटात येथील स्थानिक ग्रामस्थांनी व अनेक मुंबईहून येणारे पर्यटक व चाकरमानांनी थाटामाटात साजरे करताना दिसण्यात आलेले आहेत. गणपती विसर्जन करताना अनेक स्थानिक ग्रामस्थानाने टाळ  मृदुंग अनेक प्रकारची संगीतमय वाद्य,ढोल,ताशे , यांच्या सानिध्यात गणपती बाप्पाला निरोप देताना दिसले. अनेक स्थानिक ग्रामस्थानाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना आरती, भजन व आपली हिंदू संस्कृती प्रमाणे आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक कोकणातील समुद्रकिनारी व नदीकाठी गणपती बाप्पाचे विसर्जन होताना दिसण्यात आले. तेव्हा अनेक ठिकाणी नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन करताना कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून गावातील स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे कर्तव्य दक्ष अधिकारी, होमगार्ड, सुरक्षा रक्षक दल, सागर रक्षक दल, जीव रक्षक दल, पोलीस दल, स्वयंसेवी संघटना, महिला सुरक्षिता पथके अनेक समुद्र व नदी ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप करताना तेथे सुरक्षा  करताना दिसले. गणपती विसर्जनाचा हा अलौकिक क्षण हा समुद्र ठिकाणी व नदीकाठी काही विलक्षण असा दिसण्यात आलेला आहे अनेक भक्तांच्या डोळ्यात  भक्तीचे अश्रू बाप्पाला निरोप देताना दिसण्यात आलेले आहेत. गणपती विसर्जनाचा हा सण विसर्जनाचा हा सण मनाला हलवून जाणारा असा हा आहे. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी काढण्यात आलेल्या आहेत. तेव्हा हा गणेश चतुर्थीचा विसर्जनाचा सण सर्व गणेश भक्तांना आनंदाचा व सुखदायक जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌺 महाराष्ट्र ग्रामीण न्युज 🌺