Ticker

6/recent/ticker-posts

बाजार समित्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.



पत्रकार: कुमार बालाजी कोळपे 

तारीख:- 9/10/2026 

बातमी: महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील बाजार समित्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले आहेत. या ठरावांची अंमलबजावणी करून बाजार समित्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे प्रभारी सभापती संतोष ज्ञानोबा सोमवंशी यांनी राज्याचे पणन

व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात दुष्काळी भागातील बाजार समित्यांकडून पणन मंडळाकडे भरण्यात येणारे अंशदान माफ करावे, तसेच राज्यातील बाजार समित्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडून माफी मिळावी, अशी मागणी करण्यात आली

आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी नवीन सुधारित आकृतिबंध व नोकरभरतीबाबत काढलेल्या परिपत्रकाचा पुनर्विचार करावा. बाजार समित्यांच्या अभ्यास दौऱ्याबाबत शासनाने निर्गमित केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. बाजार समित्यांच्या आवारातील विकासकामे करण्याच्या दृष्टीने कलम १२ (२) चे अधिकार बाजार समित्यांना मिळावेत, तसेच अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालकांना कर्जमाफीचा लाभमिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.