Ticker

6/recent/ticker-posts

कै. कु. दुर्गा क.बनमेरू बनमेरू महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन




शारीक शेख @ ग्रामीण प्रतिनिधी 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या वतीने कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार येथे "आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा (पुरुष) झोन - ब" चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाच्या अमृत क्रीडा मैदानावर संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख आयोजक तथा प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू तर उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य मा. डॉ. विजय नागरे व प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवाभावी संस्था, परभणीच्या अध्यक्षा मा. सौ. उषाताई ता. गोले ,  , सिनेट सदस्य डॉ. संतोष कुटे, अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू , माजी प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे , समन्वयक प्रा. डॉ. मंगेश ठोंबळ (शारीरिक शिक्षण संचालक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शारीक शेख यांनी करत उपस्थितांना महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  प्रथमच आंतर महाविद्यालयीन पुरुष कबड्डी चे आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे, महाविद्यालयाने पंचवीस वर्षाच्या इतिहासात स्वतःच्या कष्टाने हा प्रवास पूर्ण केलेला आहे असे सांगत खेळाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आपल्या उद्घाटन पर मनोगतात प्राचार्य डॉ.विजय नागरे सरांनी सांगितले की कबड्डी व कुस्ती हे खेळ असे आहेत की यामध्ये कौशल्य व ताकद यांचा समन्वय घडून उत्कृष्टपणे आपला खेळ दाखवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ.संतोष कुटे सरांनी महाविद्यालयात दरवर्षी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा चे आयोजन उत्कृष्ट प्रकारे केले जाते याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच अमृत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा  गोले मॅडम यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत खेळ प्रकारामध्ये सुद्धा आपण आपल्या उज्वल भविष्याची निर्मिती करू शकता असे सांगितले

 तसेच अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतोष क. बनमेरू यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी खेळाडू वृत्तीने आयुष्यात पुढे जावे असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांनी सांगितले की आमच्या महाविद्यालयात या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय कबड्डी पुरुष झोन ब स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाविद्यालयाला दिल्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आभार मानले. तसेच त्यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की क्रीडा स्पर्धा या खिलाडू वृत्तीने खेळाव्यात व खेळाच्या जोरावर तुम्ही तुमचा नावलौकिक मिळवावा . स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी झोन ब अंतर्गत एकूण २२संघ सहभागी झाले असून या स्पर्धा दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ ते २६ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.महेंद्र भिसे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सौरभ गायकवाड यांनी केले. आंतर महाविद्यालयीन स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी विदर्भ राज्य कबड्डी असोसिएशन चे मोलाचे सहकार्य लाभले होते. या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.  संतोष बनमेरू, माननीय तहसीलदार श्री भुषण पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष श्री शुभम बनमेरू, सेवानिवृत्त शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्याम केला उपस्थित होते.अंतिम सामना 

विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर व आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वरवट बकाल या संघादरम्यान झाला, यात विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर विजयी ठरला तर उपविजयी 

 आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वरवट बकाल हा संघ ठरला, अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा झोन ब यशस्वी करण्यासाठी विदर्भ राज्य कबड्डी असोसिएशन,  महाविद्यालयातील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.