Ticker

6/recent/ticker-posts

देऊळगाव राजा–जाफ्राबाद मार्गावर जीवघेणे खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष



अनिल चव्हाण, ग्रामीण प्रतिनिधी

देऊळगाव राजा ते जाफ्राबाद मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.