पत्रकार: राजू कोकणी - ग्रामीण प्रतिनिधी
दि. 01 ऑक्टोंबर 2026,
गाव - रांजणगाव, ता. साक्री, जि. धुळे
छेडवेल कोर्डे वीज उपकेंद्रांतर्गत बासर व रांजणगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीतील विद्युत मोटारी वेळेवर सुरू करता येत नसल्याने पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. याबाबत बासर व रांजणगाव येथील शेतकऱ्यांनी छेडवेल कोर्डे येथील महावितरण कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वीजपुरवठा नियमित व सुरळीत करावा, वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार थांबवावेत तसेच तांत्रिक अडचणींची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
.jpg)




Social Plugin