अतनूर प्रतिनिधी / जळकोट (प्रतिनिधी) :
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून जैवविविधता संवर्धन ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिजामाता शाळा जळकोट रोड, अतनूर (ता. जळकोट) येथे दि.१७ नोव्हेंबर वार शनिवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव आणि जैवविविधता जनजागृती मोहिमेची अत्यंत उत्साही वातावरणात सांगता झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये निसर्ग, प्राणी, पक्षी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत व्यापक मार्गदर्शन करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डाचे सेवानिवृत्त सचिव बी. एन. कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य जी. एस. घोरबांड, दलितमित्र, प्राणी-पक्षी मित्र व व्यसनमुक्ती चळवळीचे खंदे कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आणि प्राचार्य व्ही. एस. कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी व्यासपीठावर हिप्पळनारीच्या सरपंच इंदरबाई रामचंद्र शिंदे, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत रामचंद्र शिंदे, प्रा. वर्षाताई बिरादार-मरगणे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रूक्मीनबाई सोमवंशी, मायाताई बिरादार, वसुंधरा महिला मंडळाच्या सचिव सौ. संध्या शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई कांबळे आणि राजकुमार कापडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान बोलताना सेवानिवृत्त सचिव बी. एन. कांबळे यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव आणि जैवविविधतेचे रक्षण करणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे सांगितले. प्राणी-पक्षी मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी वन्यजीवांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्राणी व पक्षांवर दया करण्याचे तसेच व्यसनमुक्तीचे आवाहन केले. सेवानिवृत्त प्राचार्य जी. एस. घोरबांड व प्राचार्य व्ही. एस. कणसे यांनीही जैवविविधतेचा ऱ्हास रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला अतनूर आणि परिसरातील नागरिक, महिला मंडळाच्या सदस्या व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व प्रसिद्धीचे काम पत्रकार संजय शिंदे अतनूरकर यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.





Social Plugin