Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अदितीताई पोहरे यांच्या शिक्षक संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 


*धारणी -

प्रतिनिधि- रोशन ओलोकार दिनांक -22/10/2026

*बालाजी मंगलम येथे शिक्षकांची मोठी उपस्थिती; शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि जुन्या पेन्शन योजनेवर चर्चा*

*धारणी :* अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ धारणी येथील बालाजी मंगलम येथे आयोजित शिक्षक संवाद व चर्चासत्राला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि जुन्या पेन्शन योजनेसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

शिक्षकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, हा या संवादाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मांडले.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक व्यवस्थेतील अडचणी यावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य करताना, प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे आमदार झाल्यास धारणी तालुक्यातील शिक्षकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी राहील, अशी भूमिका मांडली. तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या विविध समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रा. अदिती पोहरे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित या संवादात सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला शिक्षक प्रतिनिधी प्रा. नितीन देशमुख, प्रदीप भिसे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश मालवीय, शहराध्यक्ष जि. प. चे माजी सभापती महेंद्रसिंग गहलोत, रमेश जिराफे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित या चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि त्यांच्या संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. शिक्षकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.