Ticker

6/recent/ticker-posts

निंबा गावात स्त्रीशक्तीचा सन्मान! नवरात्रीच्या निमित्ताने शेतकरी महिला प्रमाणपत्र नोंदणी स्तुत्य उपक्रम



प्रतिनिधी निंबा अनिकेत चांदणे

नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त निंबा गावात शेतकरी महिला प्रमाणपत्र काढून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत गावातील एकूण ३८४ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र नोंदणी करून देण्यात आली . प्रत्येक महिलेला अंदाजे १०० रुपयांचा आर्थिक फायदा झाल्याने संपूर्ण गावातील महिलांना मिळून एकूण ३८,४०० रुपयांचा फायदा झाला.

विशेष म्हणजे, हे सर्व काम महिलांसाठी पूर्णपणे मोफत करून देण्यात आले. या सामाजिक कार्यासाठी पोलीस पाटील प्रोमोद जी देशमुख यांनी पुढाकार घेतला. गावातील ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांनीही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करून महिला सन्मानाचा आदर्श घालून दिला. स्त्रीशक्तीचा सन्मान, महिलांचा स्वाभिमान आणि गावाच्या विकासासाठी योगदान! 

नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीची पूजा करत असताना गावातील प्रत्येक महिलेचा सन्मान करणे, तिला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी स्त्रीशक्तीची उपासना आहे.या उपक्रमातून निंबा गावाने महिला सन्मानाचा एक सुंदर संदेश दिला आहे. सर्व सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील आणि सगणक चालक म्हणून जिवन परघरमोर यानी सर्व नोंदणी हें नि शुल्क करून दिल्या