Ticker

6/recent/ticker-posts

अकोट–हिवरखेड मार्गावर पाईपलाईन गळतीमुळे पाण्याची नासाडी.



अकोट–हिवरखेड मार्गावर पाईपलाईन गळतीमुळे पाण्याची नासाडी

अकोट प्रतिनिधी : सैय्यद मज़हर अली

अकोट–हिवरखेड मार्गावरील छोटा अडगावजवळ पोहर नाल्यापाशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने गळतीची दुरुस्ती करावी आणि संपूर्ण पाईपलाईनची तपासणी करून पाण्याचा अपव्यय रोखावा, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.