Ticker

6/recent/ticker-posts

तणाव विरहित अध्यापन पद्धती आनंददायी शिक्षणाकरता प्रभावी ठरते -डॉ. श्री. रामचंद्र कोरडे

  छायाचित्र पुसेगाव - प्राचार्य डॉ. श्री.रामचंद्र कोरडे साहेब यांचा सत्कार करताना श्री. एस.आर. पाटील सर, श्री जयंतराव जाधव  व श्री. के. डी. पवार सर. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध

 

बुध   दि [प्रकाश राजेघाटगे] 

यशस्वी जगण्यासाठी जीवन कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. शाळांमधून विद्यार्थी प्रबोधना बरोबर पालक प्रबोधन देखील व्हायला हवीत. आपल्या पाल्याची आवड व त्याची क्षमता याचा योग्य मेळ घालून त्याच्या भविष्यास दिशा द्या . नवीन शैक्षणिक धोरण, पालक,शिक्षक, विद्यार्थ्यांची जबाबदारी हे समजून घ्या. शालेय जीवनापासूनच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. विद्यार्थ्यास  कोण शिकवतो यापेक्षा तो कसा शिकतो हे  समजून घ्या. दैनंदिन अध्यापनातील पद्धत तणाव विरहित असायला हवी यामुळे  अध्ययन अध्यापन पद्धती आनंददायी व प्रभावी बनते असे विचार डायट फलटणचे निवृत्त प्राचार्य व माजी.उपसंचालक डॉ.श्री. रामचंद्र कोरडे (साहेब ) यांनी व्यक्त केले.

 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकांची जबाबदारी या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.पथक पर्यवेक्षण कमिटीचे मा. के. डी. पवार सर यांनी प्रस्तविक व स्वागत केले.श्री मोहनराव गुरव सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.संस्था विश्वस्त श्री. एस. आर. पाटील सर यांनी आभार मानले.

 या मार्गदर्शन शिबिरास  संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,संस्था पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमास संस्था सदस्य श्री. जयंतराव जाधव  सर, प्राचार्य श्री गोफणे डी. एन., मुख्याध्यापक श्री. आर. एन. जाधव, श्री वळवी ए. के.,प्रा. जे. बी. जाधव, पर्यवेक्षिका  सौ. लाड एस. जे.,श्री.जगदीश कुचेकर, सौ. स्नेहल जाधव, कु. धनश्री पोतदार व विविध शाखांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.