Ticker

6/recent/ticker-posts

हाणमंतराव अनपलवार आदमपूरकर निधन वार्ता



ग्रामीण प्रतिनिधी, महमदरफी मदार आदमपूरकर ...

आदमपूरःबिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी हाणमंतराव लच्छमन्ना अनपलवार-आदमपूरकर (जमादार) (वय ९०) यांचे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:०३ वाजता दीर्घ आजाराने नांदेड येथे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी ३ वाजता आदमपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर व खतगांव प्राथमिक रूग्णालयातील औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण अनपलवार यांचे वडील होते.