Ticker

6/recent/ticker-posts

परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत अन्नदान व वस्त्रदानाचा स्तुत्य उपक्रम.



 मनिष जाधव, अमळनेर

सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात; मान्यवरांची उपस्थिती

अमळनेर  | प्रतिनिधी : चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी अन्नदान व वस्त्रदानाचा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

मा. श्री. प्रकाशचंद्र हिरालाल पारख (माजी अध्यक्ष, ओस्वाल समाज), मा. श्री. गोविंदजी रमेशचंद्रजी अग्रवाल (मोहन कृषी उद्योजक), श्री. जितेंद्र प्रकाशचंद्र पारख (अध्यक्ष, लायन्स क्लब) तसेच लायन्स क्लब अमळनेर आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष श्री. विनोद भैय्या पाटील, प्रशासन अधिकारी श्री. संजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. चेतन राजपूत, लायन्स क्लबचे सेक्रेटरी श्री. जयेश गुजराथी, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. प्रियांक पटेल, सौ. कविता पारख, सौ. उषाबाई पारख, डॉ. संदीप सराफ, श्री. प्रवीण पारख, श्री. हैबतराव पाटील, श्री. अर्जुन पाटील, श्री. रघुनाथ पाटील, श्री. करमचंद ताथेड, श्री. विरेंद्र वाघवाणी, श्री. जयदीप राजपूत, सौ. भाग्यश्री राजपूत, श्री. महेश राजपूत, श्री. निखिल पारख, श्री. किरण पाटील, श्री. गुणवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाशचंद्र पारख तसेच श्री. मनीष पारख यांनी आपल्या मनोगतात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेचे संस्थापक, शिक्षक व कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेल्या परिश्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. अशा संस्थांना समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे निवासी शाळेतील दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अन्नदान व वस्त्रदानासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ मदतच मिळत नाही, तर समाजातील विविध घटकांकडून आपुलकी, माणुसकी आणि सहकार्याची भावना अनुभवायला मिळते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले. शाळेच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती श्री. हेमंत महाजन सर यांनी उपस्थितांना दिली. त्यांनी उपस्थित मान्यवर, देणगीदार, सामाजिक संस्था आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.