ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक कार्ड कॅम्पचे आयोजन
कळंबोली प्रतिनिधी श्री.अवधूत साळुंखे : ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी पनवेल महानगरपालिका (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका सौ.लीना अर्जुन गरड यांच्या तर्फे महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
हा विशेष कॅम्प दि. १८ व १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कॉलनी फोरम ऑफिस, सेक्टर ११ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबत अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमुळे ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा मिळणार आहेत.
त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या कॅम्पला उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका सौ. लीना अर्जुन गरड यांच्या तर्फे करण्यात आले आहे.





Social Plugin